गरोदर स्त्रियांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन

पुणे – गरोदर स्त्रीने काय खावे आणि काय टाळावे, गर्भवतींना व्यायामाचा कसा फायदा होतो, गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत कशी काळजी घ्यावी, असे विविध प्रश्न गर्भवतींच्या मनात असतात. अशा सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी “ऑयस्टर अँड पर्ल’ रुग्णालयातर्फे एका खास सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्रासाठी गरोदर स्त्रियांना मोफत प्रवेश आहे. रुग्णालयाच्या संचालिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस यांनी ही माहिती दिली. हे सत्र शनिवार, दि. 16 जून रोजी दुपारी 4 ते संध्याकाळी 7 या वेळात कोथरुडमध्ये मयूर कॉलनी येथील अंबर हॉलमध्ये होणार आहे. डॉ. अमिता फडणीस यांच्यासह डॉ. मीनल मेहेंदळे, डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. गीता ठाकुर, डॉ. रेणुका सुरपुर, आहारतज्ज्ञ पल्लवी निगवेकर या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)