गरोदर महिलेची जाळून घेत आत्महत्या

पिंपरी – पतीच्या त्रासाला कंटाळून दोन महिन्याच्या गरोदर महिलेने जाळून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.29) सकाळी पिंपळे निलख येथे घडली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मनिषा राजेंद्र प्रजापती (वय-25, सध्या रा. विशालनगर, पिंपळे निलख, मूळ रा. उत्तरप्रदेश), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर पती राजेंद्र रामसुचीत प्रजापती (वय-29) याला अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी मनिषाचा भाऊ मनोजकुमार प्रजापती यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली.

-Ads-

मनिषा व राजेंद्र यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना अडीच वर्षाचा मुलगा आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी राजेंद्र तिचा छळ करत होता. या त्रासाला कंटाळून तिने स्वतःला जाळून घेतले. यामध्ये ती गंभीररित्या भाजली गेली होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगवी पोलीस ठाण्यात राजेंद्रविरोधात गुन्हा दाखल झाला असून सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)