गरोदर पणाचे वय वाढल्याने सिजेरियनचे प्रमाण अधिक?

– स्त्रीचे वय वाढल्याने अनेक अडचणी
प्रभात वृत्तसेवा
पुणे- हल्ली प्रसुतीदरम्यान नॉर्मल ऐवजी सिजेरिअन करूनच बाळ जन्माला आलेल्या केसेस अधिक ऐकायला मिळतात. मात्र, एकुणात लग्नाचे वय वाढले असून मूल जन्माला घालण्याची वेळही पुढे गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या अडचणींमुळेच अनेकदा सिजर (शस्त्रक्रिया) करून बाळाला जन्म द्यावा लागत असल्याचे मत ससून रुग्णालयातील प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रमेश भोसले यांनी सांगितले.

सिजेरियन वाढण्याची संभाव्य कारणे
– लग्नाचे एकूणच सरासरी वय, फॅमिली प्लानिंगमुळे मातेचे वय वाढणे
– वय वाढल्यामुळे वजन वाढण्याचे प्रमाणही वाढणे
– त्याबरोबर हायपर टेंशन, मधुमेह आदी गोष्टींचे प्रमाण वाढल्याने
– वय वाढल्याने गर्भाची वाढ मंदावणे
– कळा सहन करण्याची शक्‍ती किंवा मानसिकता नसणे
– संभाव्य धोक्‍यांचे आधीच निदान झाल्याने ते टाळण्यासाठी सिजर करणे
– आधीचे सिजर असेल तर शक्‍यतोवर सिजरच करणे
– काही डॉक्‍टरांकडून आर्थिक फायद्यासाठी सिजर केले जात असल्याचा आरोप

डॉ. भोसले म्हणाले, अलीकडच्या काळात आई व वडिल अशा दोघांच्याही नोकऱ्या, करियर, आर्थिक स्थैर्य या सर्वच गोष्टींचा विचार होता लग्नाचे आणि पर्यायाने मूल जन्माला घालण्याचे वय वाढले आहे. जसजसे वय वाढते तश्‍या काही महिलांमध्ये समस्याही वाढीस लागतात. लठ्ठपणा हा गरोदरपणासाठी काहीसा अडचण निर्माण करणारा आहे. तसेच, ताण तणावामुळेही गर्भ राहण्यास अडचणी येतात. ब्लडप्रेशर कमी जास्त होणे आदी गोष्टी होतात.
मात्र, यामध्ये काही चांगल्या गोष्टीही आहेत. पूर्वी माता मृत्यू प्रमाण खूप होते. हल्ली बदलते तंत्रज्ञान पाहाता प्रसुतीदरम्यानचे संभाव्य धोके ओळखता डॉक्‍टर आधीच सिजेरियनचा निर्णय घेतात. बाळ व बाळंतीण कसे सुखरूप राहील या दृष्टीकोनातूनही अनेकदा सिजरचा निर्णय घेण्यात येतो. काहीवेळा प्रसुतीदरम्यान होणाऱ्या कळा सोसण्याची क्षमता कमी झाल्यानेही सिजेरियनचा सल्ला दिला जातो. वय वाढल्यामुळेच सिजर होण्याचे प्रमाण वाढले आहे असा सध्या तरी कोणते संशोधन झालेले नाही. मात्र लठ्ठपणामुळे येणाऱ्या अडचणींबाबत अभ्यास झाला आहे. माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील 34 वर्षांच्या प्रॅक्‍टिसवरुन अनुवभावरुन तरी मला ही कारणे महत्त्वाची वाटतात असेही डॉ.भोसले यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत काही रुग्णांना वैयक्‍तिक अनुभव आले आहेत. काही खासगी दवाखान्यातील डॉक्‍टरांकडून पेशंट पहाण्याआधीच सिजरच केले जाईल असेच जाहीर करण्यात येते. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये डॉक्‍टरांना फारसे पैसे मिळत नाहीत त्यामुळेच त्यांनी सिजेरियनचे पॅकेजच ठरवले असून रुग्णांना भिती घालून सिजरच करायला लावत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान हल्ली सिजेरियनमुळे होणारे पुढील दुप्परिणाम टाळण्यासाठी अनेक रुग्णांकडून डॉक्‍टरांना असेही सांगितले जाते की तुम्हाला हवे तर पैसे सिजेरियनचे घ्या पण कृपया डिलिव्हरी नॉर्मल करा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)