‘गरुडांचं राज्य’ असणारं गाव

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे; परंतु मोर हे सर्रास दिसत नाहीत. मात्र ते दिसतात तेव्हा मन आनंदानं भरून येतं. पिसारा फुलवलेला मोर पाहतानाचा आनंद काही औरच असतो. त्यामुळंच पावसाळ्याच्या दिवसांत टेकड्यांवर एखादा मोर दिसल्यास अवतीभवतीचे लोक लगेचच थांबतात आणि त्या मोराचं दर्शन घेतात. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी गरूड आहे. मात्र, हा पक्षी तमाम अमेरिकन लोकांनी जवळून पाहिला असणार, अशी शक्‍यता जरा कमीच वाटते. असे असले तरी अलास्काच्या युनालास्कातील लोकांना गरूड हा काही नवा पक्षी नाही. कारण, या गावात अगदी कबूतरासारखे गरूड आकाशात भरारी मारताना दिसतात.

युनालास्काची लोकसंख्या 4700 आहे. या लोकांची सुमारे 600 गरुडांशी चांगलीच गट्टी जमली आहे. हा शिकारी पक्षी असल्याने गावातील लोकांना आपल्या पाळीव प्राण्यांची मात्र विशेष काळजी घ्यावी लागते. अमेरिकेतील इतर भागांच्या तुलनेत युनालास्कामध्ये गरुडांकडून हल्ले होण्याची शक्‍यता जास्त असते. कारण, गरुडांना माणसांची जवळीक नको असते. ज्यावेळी अशी वेळ येते तेव्हा या पक्षांकडून हल्ला होण्याची शक्‍यताही जास्त असते. प्रचंड वेग आणि तितकीच तीक्ष्ण नजर हे शिकारी गुण असलेला हा पक्षी उंच झाडावर घरटे बांधतो.

मात्र, युनालास्कामध्ये झाडांची संख्या कमी असल्याने गरूड पर्वतकड्यांवर अथवा इमारतींमध्येच घरटे बांधतात. यामुळे ते माणसाच्या अगदी जवळ असतात. यामुळे तेथील प्रशासन नेस्टिंग सिझनमध्ये वॉर्निंग बोर्ड लावते. एकूण काय, युनालास्कामध्ये गरुडांचेच राज्य चालते, असेच म्हणावयाचे.

– स्वाती देसाई


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)