गरीब विद्यार्थ्यांना जेईई, नीटचे मोफत धडे

केवळ शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाच संधी
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.6 – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून दक्षणा फाउंडेशन या संस्थेबरोबर झालेल्या करारानुसार शासकीय तसेच शंभर टक्‍के अनुदानित शाळांमधील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना नीट व जेईई सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक जिल्हावार याची परीक्षा होऊन यातून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
इयत्ता बारावीमध्ये शिकत असणाऱ्या इयत्ता बारावीनंतर एक वर्ष निशुल्क नीट व जेईईचे धडे देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलांचा राहाण्याचा व भोजनाचा खर्चही संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने फाउंडेशनबरोबर याबाबत करार केला असून यानुसार केवळ शासकीय व शंभर टक्‍के अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे उत्पादन दीड लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच, दहावी या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयात 70 टक्‍क्‍याहून अधिक गुण मिळालेले असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना आपापल्या शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांची यादी jdst@dakshana.org या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)