गरिबाची भाकरी करपली… महिनाभरात ज्वारी हजार रुपयांनी महागली

दुष्काळाने मार्केटयार्डातील आवकही घटली

पुणे- राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे ज्वारीचे उत्पादन घटले आहे. परिणामी, आवक घटली आहे. त्यामुळे मागील तीन आठवड्यांत ज्वारीच्या भावात क्विंटलमागे सुमारे 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे भाकरी करपली असून गरिबाच्या ताटातून गायब झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मार्केटयार्ड येथील भुसार विभागात खान्देश येथील चोपडा, रावेर, धरणगाव, अंमळनेर, यावल, भुसावळ, एरंडोल, पारोळा याबरोबरच धुळे, नंदुरबार आणि सोलापूर जिल्ह्यातून बार्शी, करमाळा, मंगळवेढा, सांगोला, नगर जिल्ह्यातून जामखेड, खर्डा भागातून येत असते. सोलापूर, नगर जिल्ह्यातून येणारी ज्वारी गावरान असते. मात्र, यावर्षी या भागात दुष्काळ पडला आहे. परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे ज्वारीची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे. जिथे थोडेफार उत्पादन झाले आहे. तिथेच स्थानिक पातळीवरच त्या ज्वारीची विक्री होत आहे. परिणामी, मार्केटयार्डात ज्वारीची आवक घटली असल्याचे सांगून दि पुना मर्चंट्‌स चेंबरचे सहसचिव विजय मुथा म्हणाले, “गेल्या वर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये दररोज सुमारे 25 ट्रक आवक होत होती. महिनाभरापूर्वी मार्केट यार्डातील भुसार विभागात दररोज सुमारे 25 ट्रक आवक होत होती. मात्र, ती घटली आहे. आता दिवसाला केवळ 1 ते 2 ट्रक येत आहे. त्यामुळे तीन आठवड्याच्या कालावधीत ज्वारीचे भाव सुमारे 1 हजार रुपयांनी वधारले आहे. तर व्यापारी प्रमोद छाजेड म्हणाले, “त्यातच वाढलेल्या डिझेलच्या किंमतीचाही भावावर परिणामही झाला आहे. त्यामुळेही ज्वारीचे भाव तेजीत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास ज्वारीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.’

ज्वारीचे प्रकार आणि भाव
सध्या बाजारात दुरी ज्वारीच्या प्रतिक्विंटलला 2 हजार 500 ते 2 हजार 700 रुपये भाव मिळत आहे. दुरी ज्वारी ही गावरान ज्वारीच्या तुलनेत दर्जाने हलकी आणि आकाराने लहान असते. तर मालाची चमक, आकार यावरून ज्वारीला भाव मिळतो. बेस्ट गावरानला 3500 ते 3700, मिडियम बेस्टला 3200 ते 3400, एक्‍ट्रा बोल्डला 4000 ते 4200 आणि ज्युटला 4200 ते 4500 रुपये भाव मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)