गरिबांवर हातोडा, धनदांडग्यांचे काय?

वाईतील अतिक्रमण हटाव मोहिमेचे वाजले तीनतेरा
पालिका, पोलीस प्रशासनाची अतिक्रमण हाटाव मोहीम संशयाच्या भोवऱ्यात
वाई शहरातून उमटतायत संतप्त प्रतिक्रिया
वाई, दि. 5 (प्रतिनिधी)- वाईत नुकतीच अतिक्रमण हटाव मोहिम धुमधड्याक्‍यात राबवण्यात आली. पोलिस फौजफाट्यात भाजीमंडईत पालिकेच्या जागेत बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या दुकानांवर कारवाई करून हुसकवुन लावण्यात आले. वाईच्या भाजीमंडईत अतिक्रमणावर हातोडा मारुन पालिकेने स्वतःचीच पाट थोपटून घेतली. गरिबांवर हातोडा पण धनदांडग्याचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच अतिक्रमण मोहिमेत राजकारण आल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी एकाकी पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नगराध्यक्षा व महाआघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी अतिक्रणावर कारवाई करीत नसल्याचे निवेदन दिले. परंतु प्रत्यक्षात मताच्या राजकारणासाठी अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीमागे पालिकेचे सर्वच पक्षांचे पदाधिकारी व नगरसेवक उभे राहिल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी एकट्या पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या सहमतीने मंडईतील अतिक्रमण झाले असल्याचे समोर आले आहे. परंतु “नवा राजा नवा कायदा’ राबविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायधीश निवासस्थानासमोरील भंगार व्यावसायिकांना गतवेळेस हटवताना तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे त्या ठिकाणाची मोहीम अर्धवट सोडून प्रशासनाला माघारी फिरावे लागले होते. पालिका प्रशासनाच्या मेहरबानीने लाभार्थींना राहण्यासाठी घरे दिली नसल्याने मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना अतिक्रमण हटाव मोहीम अर्धवट सोडून मोकळ्या हाताने या ठिकाणाहून परतावे लागले होते. मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर पालिकेने कधीच कारवाई केली नाही. या ठिकाणी निव्वळ तोंड देखलेपणा केला जातो, त्यांच्या विनंत्या मान्य केल्या जातात, असे असल्याचे अनेकांनी जाहीर बोलून दाखविले. या परिसरातील हातगाडे, चायनीज वाले पुन्हा त्याच ठिकाणी गाड्या लावून व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. आणि विशेष म्हणजे व्यावसायिकांनी मोहिमेला विरोध केला नाही. बहुतेक व्यावसायिकांनी आम्ही रस्त्यावर आलेले अतिक्रमण काढुन घेतो, अशी विनंती करूनही मुख्याधिकारी यांनी कोणाचंही न ऐकता गरीब दुकानदारांचे पुढे आलेले पत्रे, नावाचे फलक जेसीबीने पाडण्यात आले आहे. धनदांडग्याची अतिक्रमण मात्र आपल्या जागेवरच आहेत. त्यामुळे व्यवसायिक व स्थानिक नागरिक यांच्यामध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त करण्यात आला आहे. मुळात अतिक्रमण मोहीम राबविण्याचा उद्देशच काय असा प्रश्न अनेक जण उपस्थित करीत आहेत.
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना या चुकीच्या अतिक्रमण मोहिमेसंदर्भात निवेदन देवून अतिक्रमणाची व्याख्या आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी समजावून सांगावी व वाई शहरात असणाऱ्या 153 धनदांडग्याच्या अतिक्रमणावर हातोडा कधी मारणार? याविषयी खुलासा करण्याचा आग्रह धरला होता. की फक्त गरिबांच्या दुकानावर पालिका प्रशासन हातोडा फिरवून आपली पाट थोपटून घेणार अशी काहीशी परिस्थिती सध्या दुर्दैवाने पाहवयास मिळत आहे. त्यामुळे वाई शहरात अतिक्रमण मोहोमेविषयी उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

शहरातील अन्य भागातील अतिक्रमणांचे काय?
वाई नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी भाजी मंडई परिसरातील अतिक्रमणे भुईसपाट करून निव्वळ फार्स तयार केला. पालिकेने राबविलेली अतिक्रमण मोहीम पूर्णपणे थंड पडली आहे. तरी शहरातील रविवार पेठ, धर्मपुरी, ब्राह्मणशाही, रामडोह आळी, गणपती आळी, मधली आळी, गंगापुरी या परिसरातही अनेक ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांचे काय झाले? ती काढण्यास पालिकेला कधी मुहूर्त मिळणार? हा प्रश्न सध्या चर्चीला जाऊ लागला आहे. संबंधित परिसरातही वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच होवून बसली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)