नवी दिल्ली – ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस यांनी गरिबांच्या मदतीसाठी 14,500 कोटी रुपये (2 अब्ज डॉलर्स) दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ बेजॉस यांनी एक फंड उभारला असून त्यासाठी स्वत:च 2 अब्ज डॉलर्सने दानाची सुरुवात केली आहे. कौटुंबिक आणि शैक्षणिक अशा दोन गटांत हा फंड विभागण्यात येणार आहे. विना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांना सहकार्य करणे आणि कमी उत्पन्न गटातील मुलांसाठी टियर वन प्री-स्कूल चेन उभारणे या दोन गोष्टींवर सुरुवातीला लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे,

या फंडाद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, नागरि संघटनांना पारितोषिके देण्यात येणार असल्याचे जेफ बेजॉस यांनी सांगितले आहे, एकूण 160 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक संपत्ती असलेले जेफ बेजॉस हे फोर्बसनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

यापूर्वी मायक्रोसॉफ्टचे बिल्‌ गेट्‌स यांनी अब्जावधी डॉलर्सचे दान केले आहे. मेलिंडा अँड गेट्‌स फाऊंडॅशनची स्थापना करून त्यांनी सुमारे 27 अब्ज डॉलर्सचे दान केलेले आहे. अमेरिकेच्याच वॉरन बफे यांनी 21.5 अब्ज डॉलर्सचे दान केलेले आहे.

भारतात दान करणारांमध्ये विप्रोचे प्रमुख अजीम प्रेमजी आघाडीवर आहेत. त्यांनी सुमारे 8 अन्ज डॉलर्सचा दानधर्म करण्याची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)