गराडे पाणीदार करण्यासाठी गावकरी दंग

गराडे-पाणी फौंडेशन व सत्यमेव जयते यांच्यामार्फत आयोजित वॉटर कप स्पर्धेत गराडे (ता. पुरंदर) गाव सहभागी झाले असून संपूर्ण गाव पाणीदार करण्याचा संकल्प करत गावातील लहान मुले, तरुण, आबालवृद्ध श्रमदान करण्यात दंग झाले आहेत. यासाठी विविध सामाजिक संस्था व व्यक्तींचा सहभाग मिळत आहे.
या स्पर्धेनिमित्त पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ कात्रजचे संचालक गंगाराम जगदाळे, सरपंच लक्ष्मीताई जगदाळे गावातील ग्रामस्थ, तरूण-तरूणी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करून वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. गावातील काही मुला-मुलींनी प्रशिक्षण घेतले. गाव पाणीदार करताना अनेक समस्या आल्या; मात्र या अडचणींवर मात करून गावातील शेतमजूर, तरूण-तरूणी आबालवृद्ध, शाळेतील विद्यार्थी श्रमदानासाठी पुढे आले. श्रमदानाला सुरूवात झाल्यावर ग्रामस्थांसोबत पुणे शहरातील स्वयंसेवी संस्थांनी संवाद साधला. यात नाईस ग्लोबल कम्युनिटी तसेच केदार बापट, धनंजय पाटील, डॉ. सुरूची बापट, विशाखा मॅडम, अशिष मेहता, धनश्री मेहता, सोनाली मॅडम, शंकरराव ढोणे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आदी गाव पाणीदार व्हावे याकरिता पुढे आले आहेत.
गावात माती बंधारे तयार करणे, समांतर चर खोदणे, शोषखड्डे, बांधाऱ्यातील गाळ काढणे, जनजागृतीसाठी गावातून मशाल फेरी, ठिंबक व तुषार सिंचन मार्गदर्शन, माती परीक्षण करणे, रोपवाटिका तयार करणे, ग्रामसभा घेणे आदी कामे नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहेत. या पाणी फाउंडेशनमध्ये लहानापासून ते थोरापर्यंत उत्साह ओसळत असल्याचे चित्र दिसत आहे, गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गावातील बाजीराव निवृत्ती जगदाळेसारखे 80 वर्षांचे आजोबा आणि इतर वयोवृद्ध मंडळी जमेल त्या पद्धतीने आपले गाव पाणीदार करण्यासाठी योगदान देत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)