गराडेत 500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

गराडे – गंगाराम जगदाळे युवा मंच, गराडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गराडे, बांदलवाडी, बोरमाळ, थापेवाडी, वारवडी, दरेवाडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी, दूरकरवाडी येथील 500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. युवा मंचच्या उपक्रमाचे हे तिसरे वर्षे आहे.यावेळी कात्रज दूध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे, थापेवारवडीचे सरपंच नीलेश जगदाळे, गराडे सरपंच लक्ष्मी जगदाळे, उपसरपंच सुनील जगदाळे, माजी सरपंच वंदना जगदाळे, माजी उपसरपंच बाळासाहेब रावडे, संजय रावडे, जलस्वराज्य अध्यक्ष समीर तरवडे, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश जगदाळे, नितिन जगदाळे, शाळा समिती अध्यक्ष किरण कुंभार, अनंता रावडे, विशाल रावडे, शिवाजी जगदाळे, नंदु पवार, भानुदास जगदाळे आदी मान्यवर ग्रामस्थ, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)