गरवारे कामगारांची दिवाळी अंधारात

पिंपरी – गरवारे कामगार संघटनेच्या वतीने पीएफच्या रक्‍कमेसाठी पुणे भविष्य निर्वाह निधी आयुक्तांमार्फत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर उच्च न्यायालयाने कंपनी मालकाच्या बाजुची शेअर्सची रक्कम कामगारांच्या वेतनाच्या 12 टक्‍के याप्रमाणे देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना अद्याप ही रक्कम न मिळाल्याने कामगारांमध्ये संताप पसरला आहे.

काम स्थगितीच्या नावाखाली गरवारे कंपनीने कामगारांना कोणतीही पुर्वसूचना न देता 27 ऑगस्ट 1996 रोजी पिंपरीतील प्रकल्पाला टाळे ठोकले. त्यामुळे पिंपरीसह नगर, सारोळे येथील 1 हजार 280 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. 2005 व 2007 च्या शासनाच्या परिपत्रकाशिवाय कामगारांची देणी भागवल्याशिवाय कंपनीची मालमत्ता विकू नये, असा नियम असतानाही कामगारांना विश्‍वासात न घेताच परस्पर कंपनी विकली गेली. यातून कामगारांना थकीत देणी म्हणून 18 टक्‍केच रक्कम अदा केली गेली. उर्वरित रक्‍कम दिली जावी तसेच ग्रॅच्युईटी मिळावी, लिक्‍विडेटरमार्फत कंपनीची सर्व मालमत्ता जप्त करावी, पीएफची 32 महिन्यांची रक्‍कम मिळावी आदी मागण्यांसाठी कामगारांचा लढा सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामगार संघटना, ट्रस्ट, कोर्ट-कचेरी करत 22 वर्ष पुर्ण झाली तरी अद्याप त्यांना त्यांची देणी मिळाली नाहीत. दरम्यान, गरवारे कामगार संघटनेच्या वतीने पीएफच्या रक्‍कमेसाठी पुणे भविष्य निर्वाह निधी आयुक्तांमार्फत उच्च न्यायालयात दावा दाखल दाखल केला होता. त्यावर उच्च न्यायालयाने कंपनी मालकाच्या बाजुची शेअर्सची रक्कम कामगारांच्या वेतनाच्या 12 टक्‍के याप्रमाणे देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम वितरीत करताना गेल्या 22 वर्षांचे व्याज व विलंब आकार आदीचा रक्कममेमध्ये समावेश असाला तसेच कंपनी कायद्याप्रमाणे तेवढीच रक्कम मालकाने कंपनीमार्फत सरकारकडे जमा करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, कंपनीने उर्वरीत रक्कम भरलीच नाही. याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा गरवारे नायलॉन समितीने दिला आहे.

थकीत रक्कम देण्यासंदर्भात कृती समितीचा लढा सुरुच आहे. मात्र, भविष्य निर्वाह निधीची रक्कम अत्यल्प आहे. त्यात काही तथाकथित कामगार व्यक्तीगतरित्या पीएफ रक्‍कम मिळवून देण्याच्या नावाखाली अर्जाचे झेरॉक्‍स काढून त्यांच्याकडे पैशांची मागणी करत आहेत. कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी दिवाळीसणासाठी पीएफची रक्कम तातडीने कामगारांच्या बॅंक खात्यात जमा करावी अशी मागणी कृती समितीने केली आहे. याबाबत भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे. त्यावर समितीचे सल्लागार अध्यक्ष गजानन गवळी, अध्यक्ष दत्तात्रय खैरे, सचिव रमेश बोंद्रे, उपाध्यक्ष मोरया बहिरट, कार्याध्यक्ष मुरलीधर चिंव्हे, सभासद अर्जुन टकले व प्रभाकर गलांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)