गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो – माजी लेफ्टनंट जनरल

संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर शब्दांमध्ये संदेश देण्याची वेळ आली तर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो असे विधान लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा (निवृत्त) यांनी केले आहे. हुडा यांनी भारताने पूर्वी केलेल्या काही सर्जिकल स्ट्राइक्समध्ये सहभाग घेतला होता.

2016 साली भारताने दहशतवाद्यांच्या कॅम्प्सवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. तो केंद्र सरकारकडून घेण्यात आणि लष्कराने त्याला मंजुरी दिली. सर्जिकल स्ट्राइक्ससारखे निर्णय हे राजकीय नेतृत्वाकडून घेतले जातात पण त्यावेळेस लष्करही अशा प्रकारची कारवाई केली पाहिजे अशा विचारात होते. पाकिस्तानला असाच पुन्हा एखादा कठोर संदेश द्यायचा झाल्यास आपण पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

29 सप्टेंबर 2016 रोजी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हीडीओ चित्रण नुकतेच काही वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले आहे. आठ मिनिटांच्या व्हीडीओमध्ये भारतीय सैनिक ताबारेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे चित्रण ड्रोनच्या साह्याने आणि यूएव्हीच्या मदतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हा सर्जिकल स्ट्राइक भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे मुख्यालय उधमपूर येथून नियंत्रित करण्यात आले असे हुडा यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)