गरज असेल तर अयोध्येत लष्करही बोलवा – अखिलेश 

अयोध्या – अयोध्येत धर्मसभा बोलावण्यात आली आहे. यानिमीत्ताने तेथे मोठी गर्दी जमवली जात आहे. त्यामुळे तेथे शांतता कायम ठेवण्यासाठी लष्कर बोलावण्याची गरज असेल तर लष्करालाही तेथे पाचारण केले पाहिजे अशी सुचना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे. आज या विषयावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की उत्तरप्रदेशातील या स्थितीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली पाहिजे.

येथे लष्कराला पाचारण करण्याविषयी त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. दरम्यान उत्तरप्रदेशचे उपमुख्यंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांची ही मागणी धुडकाऊन लावली. ते म्हणाले की येथे धर्मसभा होत आहे त्यासाठी लष्कर बोलावण्याची काहींच गरज नाही. अयोध्या परिसरातील मुस्लिमांमध्ये या गर्दीमुळे भीती निर्माण झाली आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की मुस्लिमांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त तेथे तैनात ठेवला आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)