गरजुंना मदतीची शिकवण पाटलांची

जंक्‍शन- राजकारणा पलिकडे जाऊन विविध क्षेत्रात समाजपयोगी उपक्रम राबवून गोरगरिब व होतकरु जनतेची व गरजूंना मदत करण्याची शिकवण इंदापूर तालूक्‍यातील कार्यकर्त्यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. ती शिकवण आज ही कायम असून विविध उपक्रमात तालुक्‍यात सर्वसामान्य जनतेला मदत करण्याची परंपरा हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे नांदत आहे, असे प्रतिपादन इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष हनुमंत काजळे पाटील यांनी केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निरगुडे (ता. इंदापूर) येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी हनुमंत काजळे पाटील बोलत होते. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, जिल्हा परिषद सदस्य सागर भोसले, संजय देहाडे, सरपंच, उपसरपंच सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व पदधिकारी इंदापूर कॉंग्रेस कमिटी व पालकांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)