गनिमी कावा ! बच्चू कडूंची मोंदीच्या गावाकडे कूच

नंदूरबार – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेल्या आसूड यात्रेला गुजरात पोलिसांनी नंदुरबार चेक पोस्टवरच रोखले होते. मात्र गनिमी कावा वापरुन आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत गुजरातेमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाकडे कूच केल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र त्यांनी आंदोलन केले किंवा नाही याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

नंदुरबार येथून गुजरातेत आंदोलनासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे नंदुरबार चेक पोस्टवर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी आपण आंदोलन करणार असल्याचे घोषित केले होते.
आपली घोषणा खरी ठरवत आमदार कडू हे गनिमी काव्याने गुजरातमध्ये घुसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या गावात आंदोलन केले की नाही, याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. दरम्यान आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून गनिमी कावा आमच्या रक्तात असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)