गदिमा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर

केतकी माटेगावकर हिला “विद्या प्रज्ञा पुरस्कार’

पुणे – शताब्दी वर्षांतील “गदिमा’ पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे 41 वे वर्ष असून, गदिमांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, पुरस्काराचे हे 41 वे वर्ष आहे. 14 डिसेंबर या गदिमांच्या स्मृतिदिनी संध्याकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

-Ads-

गदिमांचे पुत्र आणि गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त आनंद माडगूळकर यांनी गुरूवारी या नावाची घोषणा केली. 21 हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गदिमांच्या पत्नी विद्याताई यांच्या स्मरणार्थ गेल्या 20 वर्षांपासून “गृहिणी सखी सचिव पुरस्कार’ प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. यंदा तो हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नव्या उभारीच्या प्रतिभावंतांना प्रोत्साहन म्हणून गेल्या तीस वर्षांपासून “चैत्रबन पुरस्कार’ देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रतिष्ठानने गेल्या चार वर्सांपासून “विद्या प्रज्ञा पुरस्कार’ सुरू केला आहे. हा पुरस्कार यंदा गायिका केतकी माटेगावकर हिला जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याशिवाय शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रतिष्ठानच्या वतीन “गदिमा पारितोषिक’ दिले जाते. यावर्षी हा पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील हदगाव या गावातील विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थीनी आकांक्षा अरविंद सूर्यवंशी हिला देण्यात येणार आहे. तिने मराठी विषयात 99 टक्के गुण संपादन केले आहेत. अडीच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरणाला प्रमुख पाहुण्या म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रा. विनया बापट लिखित ” शॉर्ट स्टोरी ऑफ लेट जी. डी. माडगुळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर बाबुजी अर्थात सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या गदिमागीतांचा “प्रतिभा संगम’ हा कार्यक्रम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)