गदारोळ कमी करण्यासाठी राज्यसभा नियमांचा घेणार फेरआढावा

नवी दिल्ली – गदारोळ कमी करण्याच्या उद्देशाने राज्यसभेच्या नियमांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय त्या सभागृहाचे अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांनी घेतला आहे. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळामुळे अडथळे निर्माण होऊन दोन्ही सभागृहांचे कामकाज जवळपास ठप्पच आहे.

या स्थितीमुळे आज राज्यसभेत लवकरच निवृत्त होणाऱ्या अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली. त्याचा संदर्भ घेत नायडू यांनी नियमांच्या फेरआढाव्याचे सूतोवाच केले. राज्यसभा नियमांच्या फेरआढाव्याचा मसुदा तयार झाल्यानंतर त्यावर चर्चा होईल आणि पुढील पाऊल उचलले जाईल, असे नायडू यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज गदारोळाबद्दल नाराजी व्यक्त केली. संसदेतील गदारोळाचा ठपका सत्ताधारी आणि विरोधकांकडून परस्परांवर ठेवला जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)