गतिशीलतेसाठी महाराष्ट्रात समग्र वाहतूक व्यवस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली – गतिशीलतेसाठी समग्र वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. यानुसार बदलत्या काळातील आव्हाने लक्षात घेता समग्र वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. या दिशेने महाराष्ट्र शासनाने विविध योजना आखल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

निती आयोगाच्या वतीने येथील विज्ञान भवनात आयोजित “मुव्ह : ग्लोबल मोबिलीटी समीट’च्या दुस-या दिवशी “गतिशीलतेसाठी सातत्य, सहभाग, संलग्नता विषयक धोरण : राज्यांचा दृष्टीकोण’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, गुजरातचे मुख्य सचिव डॉ जे. एन. सिंह, केरळचे मुख्य सचिव टॉम जोस, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव डॉ. अनुपचंद्र पांडे उपस्थित होते.

एखाद्या शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रवाशांना प्रवासाच्या प्रारंभापासून ते गंतव्यापर्यंत जोडण्याची व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. त्या दिशेने राज्य शासन मुंबई शहरात मोनो रेल, मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बस आणि जलवाहतूक यांची सांगड घालून एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात वाहतूक व ऑटोमोबाईल क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी 7 महत्वाच्या बाबींचा त्यांनी उल्लेख केला. सुलभता, संधीची उपलब्धता, वाहतूक व्यवस्थेचा प्रादेशिक संतुलीत विकास, पर्यावरणाचे संवर्धन, वाहतूक व्यवस्थेच्या वैविध्यानुसार उपलब्ध स्त्रोतांची विभागणी, भविष्यासाठीची सज्जता, जगामध्ये सुरू असलेल्या उत्तम प्रयोगांची देवाण-घेवाण करणे, ही 7 सुत्रे राबविली पाहिजे. यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास देशातील विविध राज्ये व तेथील शहरांची वाहतूक व्यवस्था भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“सिंगल मोबीलीटी कार्ड’ देणार
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थवरील लोकांचा विश्वास वाढविण्यसाठी ही व्यवस्था सुगम व सुलभ होणे गरजेचे आहे. या दिशेने, राज्य शासनाने पाऊले टाकली असून प्रत्येक नागरीकाला 300 मीटरच्या आत एका पेक्षा जास्त वाहतूकीची साधने उपलब्ध व्हावी, यासाठी “सिंगल मोबीलीटी कार्ड’ उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निती आयोगही या दिशेने महत्वपूर्ण कार्य करीत आहे, नागरीकांना “नॅशनल मोबीलीट कार्ड’ उपलब्ध करून देण्याचा निती आयोगाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)