गतवर्षी कमर्शियल गुंतवणुकीत वाढ

गेल्यावर्षी कमर्शियल ऑफिस स्पेसमध्ये वैयक्तिक गुंतवणूक वाढली आहे आणि हा कल पुढेही चालूच राहण्याची शक्‍यता आहे. देशात रिटसशी संबंधित पहिली लिस्टींग यावर्षी होण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत ऑफिस स्पेसमध्ये यावर्षी पैसा येईल आणि त्याकडचा वाढता कल लक्षात घेता विकासक देखील ऑफिस स्पेसमध्ये अधिक रुची दाखवू शकतील.

यादरम्यान निवासी क्षेत्रातील मंदीमुळे आणि पुन्हा गुंतवणूक करण्याची जोखीम पाहता कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये अधिक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. कारण कोणतेही असो, सध्या देशात रेसिडेन्सियल स्पेसच्या तुलनेत कमर्शियल किंवा ऑफिस स्पेसला मागणी वाढत चालली आहे. आजघडीला रेरा आणि जीएसटीनंतर निवासी क्षेत्रात मंदी पसरली आहे आणि नवीन लॉचिंगचे प्रमाण घसरले आहे. तसेच घरांची विक्री स्थिर गतीने होत आहेत. अर्थात कमर्शियल रिअल इस्टेट सेक्‍टरला मागणी वाढतच चालली आहे. त्यामुळे बिझनेस सेंटर, व्हर्च्युअल ऑफिस, तसेच को वर्किंग स्पेसच्या विकासाला वेग आला आहे. दिल्ली, न्यू गुरुग्राम परिसर, द्वारका एक्‍स्प्रेस-वे परिसरात ऑफिस स्पेसच्या दृष्टीकोनातून विकासात तेजी येणार आहे.

-Ads-

विक्रीत वाढ
दुकान, मॉल, ऑफिसपासून ते स्टोरेजसाठी जागेची मागणी वाढल्याचे विकासक सांगतात. त्यामुळे कमर्शियलच्या जागेच्या भाड्यातही विक्रमी वाढ झाली आहे. रेसिडेन्सियल सेक्‍टरच्या तुलनेत कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये मिळणारे उत्पन्न अधिक आहे. विशेषत: एनसीआरच्या परिसरात गुंतवणुकदार अधिक भाड्याच्या ओढीने गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतात. आता तर भारताचे कमर्शियल रिअल इस्टेट सेक्‍टर जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. यातून या क्षेत्रात स्पर्धा देखील वाढली आहे.

या माध्यमातून खरेदीदारांना सर्वोत्तम, दर्जेदार सेवा मिळू लागली आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकीसाठी सध्याचा काळ रेसिडेन्सिअलऐवजी कमर्शियल रिअल इस्टेटसाठी पूरक आहे. कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये भाड्याचा दर हा 8 ते 10 टक्‍क्‍यांच्या आसपास असून तो उच्च पातळीवर आहे. या तुलनेत रेसिडेन्शियल रिअल इस्टेटमध्ये भाड्याचा दर हा 3 ते 4 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)