गतवर्षीच्या गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण अद्याप नाही

पुणे – महापालिकेतर्फे गेल्यावर्षी आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना अद्याप पारितोषिकांचे वितरण झाले नाही. इतकेच नव्हे तर यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या महापालिकेने गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना पारितोषिक वाटपाचे कोणतेही नियोजन केलेले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे. उत्सवादरम्यान पुण्यातील गणेशमंडळांनी साकारलेले भव्य-दिव्य देखावे पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक आवर्जून शहरात येत असतात. महापालिकेतर्फेही गणेशोत्सवात प्रोत्साहनपर विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत शहरातील विविध गणेश मंडळे सहभागी झाली होती. मात्र, अद्यापही या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना पारितोषिके देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तातडीने घेण्यात यावा, अशा मागणीचे पत्र पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी महापौरांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)