गणेश विसर्जन मिरवणुकीत खा.उदयनराजेंच्या पोस्टरची हवा

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) -गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्यात आ. शिवेंद्रराजे भोसलेंच्या नगरविकास आघाडीच्या स्टेज समोर उदयनराजे च्या पोस्टरची हवा झाली. सातारा गणेश विसर्जन मिरवणुकीतील खास आकर्षण म्हणजे उदयनराजे भोसले त्यांची एन्ट्री युवकांना भुरळ घालणारी ठरते. खा.उदयनराजे भोसले गणेश विजर्सन मिरवणुकीत कधी दाखल होणार याकडे सातारकरांचे लक्ष लागुन राहिल्याचे दिसले. मात्र त्याच्या अनुपस्थितीने सातारा विकास आघाडीत यावर्षी उत्साह नव्हता. गणेश मंडळांचे स्वागत करण्याकरिता या वर्षी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी, तसेच भाजप व नगरपरिषदेत सत्ताधारी असलेल्या नगरविकास आघाडी ने स्टेज उभारणी केली होती. गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी सारेच सज्ज होते. मात्र खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या अनुपस्थितीने त्याच्या आघाडीच्या स्टेज वरती फक्त नगराध्यक्ष माधवी कदम, सभापती यशोधन नारकर, माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले, राम हदगे, तर समोर भाजपचे सर्व पदाधिकारी होते. दुसरीकडे शिवेंद्रराजे यांच्या नगर विकास आघाडीच्या स्टेज वर त्यांच्या नगरसेवकांची व समर्थकांची मोठी गर्दी होती. सातार्‍यामध्ये युवकांना खा. उदयनराजे भोसले कधी येणार याबाबत उत्सुकता होती. शिवेंद्रराजे याच्या नगरविकास आघाडीच्या स्टेज समोर उदयनराजेच्या पोस्टरची हवा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानी केली. एक नेता एक आवाज उदयन महाराज च्या घोषणांनी मिरवणूकीत जल्लोष भरला. गणेश विसर्जन मिरवणुकीत उदयनराजेच्या अनुपस्थितीची क्रेज त्याच्या पोस्टर ने भरून काढल्याच्या चर्चेला मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)