गणेश मूर्ती, सजावट साहित्य खरेदीनिमित्त वाहतुकीत बदल

पुणे – श्री गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त शहरात गणेश मूर्ती तसेच सजावट साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः डेंगळे पूल ते शिवाजी पुलादरम्यान श्रमिक भवन समोर (अण्णाभाऊ साठे चौक), कसबा पेठ पोलीस चौकी, जिजामाता चौक ते मंडई पर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस बहुसंख्य स्टॉल लावले असल्याने गर्दीचे प्रमाण जास्त असते. या पार्श्‍वभूमीवर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दि. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

वाहतुकीस बंद असलेले मार्ग :
1. शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा ते गोटीराम भैय्या चौक बंद.

पर्यायी रस्ता : गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून संताजी घोरपडे पथ-कुंभारवेस चौक – शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.
– सूर्या हॉस्पिटलसमोरून पवळे चौक, कमला नेहरू हॉस्पिटलसमोरून 15 ऑगस्ट चौक, नरपतगिरी चौकमार्गे इच्छितस्थळी जावे
– शिवाजीनगरकडून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळण न घेता सरळ जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक येथून टिळक रस्त्याने जावे.
– झाशीची राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळेपूल मार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्यांनी खुडे चौकामधून मनपासमोरून प्रीमियर गॅरेज चौक , शिवाजीपूल मार्गे गाडगीळ पुतळा चौक डावीकडे वळण घेऊन कुंभारवेस चौकाचा वापर करावा.

2. कुंभारवेस चौक – डेंगळे पूल, साठे चौक ते मनपा पूल (शिवाजी पूल) सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहील. तसेच साठे चौक ते धान्य गोडावून हा रस्ता देखील सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहील.

पर्यायी रस्ता :
– पुणे स्टेशनकडूून मनपाकडे जाणाऱ्या वाहनांनी शाहीर अमर शेख चौकामधून कुंभारवेस मार्गे न जाता आरटीओ चौक, इंजिनिअरींग कॉलेज चौक मार्गे जावे.
– स्टेशन परिसरातून फरासखाना परिसरात जाणाऱ्यांनी कुंभारवेस चौकामधून डावीकडे वळण घेऊन पवळे चौक मार्गे गणेश रस्त्यावरून पुढे जावे.
– सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) दरम्यान वाहतूक सुरू राहील. मात्र, यावेळी कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करता येणार नाहीत. तसेच आवश्‍यकतेप्रमाणे बॅरिकेट्‌स आणि दोरीचा वापर केला जाईल.

वाहतूक सुरू असेलेले मार्ग
– फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज
– आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
– सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
– मंगला टॉकिजसमोरील प्रीमियर गॅरेज लेन मधून शिवाजीरोड ते खुळे चौक (जडवाहनांना प्रवेश बंद.)

पार्किंग व्यवस्था –
– मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा कॅनॉल पुलापर्यंत
– जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याचे डाव्या बाजूस
– नीलायम पूल ते सिंहगड रोड जंक्‍शन
– न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा या दरम्यान रस्त्याच्या कोर्टाकडील एका बाजूस
– वीर संताजी घोरपडे पथावर मनपा बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजूस
– टिळक पूल ते भिडे पुलादरम्यानचे नदी पात्रातील रस्त्यावर
– मंडई येथील मिनर्व्हा व आयर्न पार्किंग तळावर
– शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक या रस्त्याच्या डाव्या बाजूस

पीएमपी बसेसबाबत –
– शिवाजीनगर स्टॅन्डवरुन शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस या स. गो. बर्वे चौकातून शिवाजीपुलावरुन जाण्याऐवजी स. गो. बर्वे चौकामधून जंगली महाराज रस्त्याने टिळक चौक मार्गे स्वारगेटकडे जातील.
– कॉर्पोरेशन बसस्टॉप येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस या झाशीराणी चौक मार्गे जंगली महाराज रोडने स्वारगेटकडे जातील.
– कॉर्पोरेशन बसस्टॉप येथून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस साठे चौक कामगार पुतळा मार्गे स्टेशनकडे न जाता खुडे चौकातून मनपा समोरुन डावीकडे वळून शिवाजी चौक स. गो. बर्वे अंडरपास, सिमला ऑफिस चौक उजवीकडे वळून संचेती अंडरपास करुन कामगार पुतळा मार्गे शाहीर अमर शेख चौकामधून पुणे स्टेशनकडे जातील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)