गणेश मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात

म्हासुर्णेत मूर्तीकारांची लगबग

म्हासुर्णे – म्हासुर्णे, ता. खटाव येथे कुंभारवाड्यामध्ये गणेशमुर्तींवर अंतिम हात फिरवताना मुर्तीकार दिसत आहेत. गणेशोत्सव दोन दिवसांवर आल्यामुळे म्हासुर्णे येथील कुंभार समाज बांधव गणेशमुर्तीला शोभेल असा रंग देण्यासाठी हातघाई करत असल्याचे दिसत आहे.

म्हासुर्णेमध्ये विविध आकाराच्या वेगवेगळ्या उंचीच्या म्हणजेच एक फुटापासुन ते आठ फुटांपर्यंतच्या मुर्ती बनवण्यात आल्या आहेत. त्यांना आकर्षक रंगरंगोटी करून मुर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी अनंत कुंभार रात्रंदिवस काम करत आहेत. याबाबत मुर्तीकार अनंत कुंभार यांनी पिढीजात व्यवसाय करत असून मंडळांच्या मागणीनंतर म्हासुर्णे व भागातील मंडळांना लागत असलेल्या मोठ्या मुर्तीही बनवत असल्याचे सांगितले.

आम्ही बनवलेल्या सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेल्या आहेत. आम्ही सर्वसामान्यांना परवडेल अशा व जास्तीतजास्त मंडळांना नेण्यासाठी याव्यात, अशा आकारातील गणेशमुर्ती आम्ही बनवल्या आहेत. यासाठी आमचे कुटुंबातील सर्वजण रात्रंदिवस कष्ट करत असतो. दोन चार दिवसांत सर्व मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहे, अशी माहिती अनंत कुंभार यांनी दिली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)