गणेश मुर्तींसह सजावटींच्या वस्तूंचे दर वाढले

मूर्तीकारांसह ग्राहकांना बसणार फटका
सातारा,  (प्रतिनिधी) –
श्रावणमासाला प्रारंभ होताच गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात. सातारा शहरातील कुंभार आळीमध्ये मूर्ती बनविण्याची लगबग आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, यंदा वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याने माती व रंगासोबतच सजावटीच्या वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यावर जवळपास 28 टक्के कर लागू झाल्याने याचा मोठा फटका मूर्तीकारांना बसणार आहे. मूर्तीच्या किंमतीत 15 टक्के वाढ होणार असून त्याची झळ मूर्तीकारांसह ग्राहकांना बसणार आहे.
13 सप्टेंबरला लाडक्‍या बाप्पांचे आगमन होत आहेत. साताऱ्यात कुंभार आळी गडकर आळी बदामी विहिर परिसर तालीम खाना बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे श्री मूर्ती रंगकामानंतर विक्रीला तयार आहेत. त्यामुळे आता येथे मूर्ती विक्री आणि बाप्पांना मंडपात नेण्याच्या कामाला वेग आला आहे. दरवर्षी साताऱ्यात जवळपास पाच कोटी रुपयांची उलाढाल केवळ गणरायांच्या मूर्तीच्या माध्यमातून होते. मंडळांची गणेश मूर्ती असो किंवा घरी बसवण्यात येणारी लहान मूर्ती, सातारकर सर्वप्रथम दगडूशेठ, लालबागचा राजा, लक्ष्मी गणेश, श्री शुंड गणपती ओळीतील मूर्तीलाच प्राधान्य देतात. मात्र, यंदा हीच परंपरा सातारकर जात आहेत. पीओपी मूर्तीना मिळणारी बगल आणि नव्याने लागू झालेला जीएसटी गणपती मूर्ती बनविण्यासाठी माती आणि रंग या दोन्ही मूलभूत गोष्टी असल्याने मूर्तीकारांना जीएसटीचा मोठा फटका बसला आहे. कच्च्या साहित्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने गणेशमूर्तीच्या किमतीतही वाढ होणार आहे. मातीच्या एक फुटाच्या मूर्तीची किंमत साधारणपणे 1 ते 2 हजार रुपये इतकी असते, परंतु आता यावेळी जीएसटीमुळे तिच्या किमतीत 500 रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे, तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एक फुटाच्या मूर्तीची किंमत 1 हजार रुपये इतकी असते यामध्येही 700 रुपयांची वाढ होणार आहे. मूर्तीकारांना कारागिरांचे वेतन देणेही यामुळे परवडणारे नाही. कारागीरांचे वेतन हे 25 ते 30 हजार रुपयांच्या घरात आहेत. त्यांना वेतन देताना मूर्तीकारांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे. मात्र, बॅंकांकडून कर्ज मिळणेही कठीण असल्याने मूर्तीकारांना यंदा आथक तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने घेतलेला जीएसटीचा निर्णय योग्य आहेच, पण गणेशमूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या साहित्याला जीएसटीतून वगळावे, अशी मागणी आहे. गणेशमूर्तीच्या व्यवसायामध्ये लाखो लोक गुंतलेले आहेत. पेण, उरुळी, कांचन, बारामती, शिरोडा येथून श्री मूर्ती साताऱ्यात आणल्या जातात पण बाप्पांचे आगमन भक्‍तांच्या खिशाला चाट देणारे ठरले आहे. अगदी दोन फुटापासून ते पाच फुटापर्यतच्या श्री मूर्ती एक हजार ते पाच हजाराच्या दरम्यान आहे. मूर्तिकारांच्या आर्िर्थक स्त्रोतावरही जीएसटीचा परिणाम होत आहे. गणपतीच्या मूर्तीची किंमत वाढल्याने त्याचा फटका मंडळांना बसणार आहे. मूर्तीच्या किमती नक्षीकामावर अवलंबून असतात. नक्षीकाम उत्तम असेल तर एक फुटाची मूर्तीही 15 हजारांच्या घरात जाते. शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक पेंट, वॉटर पेंट, काथ्या यांच्या किमतीत 30 टक्क्‌यांनी वाढ झाली आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)