गणेश मंडळांनी फिरवली पाठ

पिंपरी – यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मंडळाच्या अध्यक्षांनी पाठ फिरवल्याने बैठकीचा फज्जा उडाला.

चिंचवड येथील ऑटोक्‍लस्टर सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य नामदेव ढाके, स्विकृत सदस्य ऍड. मोरेश्वर शेडगे, नामनिर्देशित सदस्य सागर हिंगणे, दिनेश यादव, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, संदिप खोत, मनोज लोणकर, श्रीनिवास दांगट, आशा राऊत, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रभाकर कोळी, सूर्यकांत मुथीयान, पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील, सुभाष चव्हाण, पोलिस मित्र संघटनेचे अशोक तनपुरे, संस्कार प्रतिष्ठानचे धनंजय सावंत आदी उपस्थित होते.

शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, मंडळांसाठी नियमावली तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सूचना स्विकारण्यासाठी महापालिकेने ही बैठक आयोजित केली होती. मात्र, महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचीच गर्दी बैठकीला झाली होती. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला होते. मात्र, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उदासिनता दाखवली.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, गणेश विर्सजनासाठी हौदांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. या करीता सर्वांची पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर चर्चा करुन त्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल. महापालिकेच्या माध्यमातून आवश्‍यक तेवढ्या सेवा-सुविधा गणेशोत्सवात पुरविल्या जातील, असेही आश्‍वासनही त्यांनी दिले. प्लॅस्टीक व थर्माकोलचा वापर करु नये, शाडुच्याच गणेश मूर्ती नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)