गणेश भांड यांना आदर्श उद्योजक पुरस्कार प्रदान

राहुरी फॅक्‍टरी – महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना आदर्श उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने श्रीरामपुर तालुक्‍यातील वळद उंबरगाव येथील लक्ष्मी टुरिझम होलिङे येथे समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवराना पुरस्कार देऊन ग़ौरविन्यात आले. देवळाली प्रवरा येथील गणेश भांड यांनी चैतन्य उद्योग समुहाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून दिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र पत्रकार संघ चा 2018’आदर्श उद्योजक पुरस्कार देऊन गणेश भांड यांना गौरविण्यात आले.महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर, उत्तर. म.देविदास बैरागी, साई आदर्शचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, अशोक दुशिंग पोलिस निरीक्षक संपत शिंदे, जिल्हाध्यक्ष दत्ता खेमनर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र हुङे , राहुरी तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवे, राजेंद्र बनकर, रामनाथ जरहाड तसेच बाळासाहेब खांदे, राजेंद्र लोंढे, पत्रकार रफीक शेख, वैभव गिरमे, नीलेश कराळे, विलास निर्मळ, तान्हाजी गवारे, यशंवत फोफसे, प्रवीण फोफसे, गौरव भांड, सौरभ घोलप आदी उपस्थित होते. भांड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)