गणेश तांबे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

कोळकी, दि. 8 (वार्ताहर) – बोधी ट्री एज्युकेशनल फौंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार गणेश भगवान तांबे यांना जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 13 जानेवारी 2019 रोजी दुपारी 12 वा. औरंगाबाद येथे होणार आहे.
गणेश तांबे हे जि. प. प्राथमिक शाळा कारंडेवस्ती (मलवडी) येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती फलटणचे युवा नेतृत्व व आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक व क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा असा हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सभापती विधान परिषद ना. रामराजे ना. निंबाळकर, अध्यक्ष जि. प. सातारा संजीवराजे ना. निंबाळकर, चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व मित्र मंडळी व नातेवाईकयांच्या कडून ही कौतुक व अभिनंदन होत आहे. या जीवन गौरव पुरस्काराचे श्रेय त्यांनी त्यांच्या स्वर्गीय आईस व निवड समितीस दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)