गणेश तलावातील गाळ काढण्याची मागणी

निगडी – निगडी प्राधिकरण येथे असणाऱ्या गणेश तलावाची दूरवस्था या उन्हाळ्यात समोर आली आहे. बऱ्याच वर्षानंतर या तलावाच्या तळाचा गाळ दिसू लागला आहे. प्रचंड प्रमाणात गाळ साचल्यामुळे त्या तलावातून झाडांना देण्यात येणाऱ्या पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे तेथे साठलेल्या गाळाचा उपसा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी आयुक्तांकडे केली आहे.

खैरनार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेश तलावातून अ प्रभाग हद्दीतील रस्त्यावरील झाडे, लागवड केलेली रोपे, नर्सरी, गार्डन अशा विविध ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. परंतु त्याच तलावात प्रचंड प्रमाणात गाळ साचून त्या तलावाची पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. गाळ उपसण्यासाकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे पाण्यापेक्षा गाळ अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्या गाळात पाणी उपसा करणाऱ्या मोटर्स ही अडकल्या असल्यामुळे पाणी उपसा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यात उन्हाची वाढती तीव्रता आणि पाणी टंचाईमुळे झाडे जळण्याची अथवा सुकण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)