गणेश तलावातील गाळ काढणार : महापौर जाधव

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, प्राधिकरणातील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढणे आवश्‍यक आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसात तलावातील गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. तसेच महापालिकेच्या सर्व उद्यानात आवश्‍यकतेनुसार “ओपन’ जीम उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या उद्याने, आरक्षणांसह मिळकतींचा महापौर राहुल जाधव यांनी आजपासून (दि. 7) पाहणी दौरा सुरू केला आहे. त्यानुसार आज “अ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या गणेश तलाव, उद्याने, व्यायमशाळा, बॅडमिंटन हॉल, क्रीडांगणे आणि जलतरण तलावाची त्यांनी पाहणी केली. माजी उपमहापौर शैलजा मोरे, “अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक अमित गावडे, केशव घोळवे, नगरसेविका वैशाली काळभोर, मीनल यादव, शर्मिला बाबर, कार्यकारी अभियंता मनोज शेठिया, प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, उद्यान अधीक्षक डी. एन. गायकवाड यावेळी उपस्थित होते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दौऱ्याविषयी माहिती देताना महापौर जाधव म्हणाले की, महापालिकेचे प्राधिकरणातील गणेश तलाव आणि उद्यान अतिशय उत्कृष्टरित्या विकसित केले आहे. अनेक नागरिक सकाळी या ठिकाणी वॉकिंगसाठी येतात. त्यांना कोणतीही अडचण येवू नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. उद्यानात आणखीन सुविधा दिल्या जाणार आहेत. गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. येत्या आठ दिवसात तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. संबंधितांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या सर्व उद्यानात आवश्‍यकतेनुसार ‘ओपन’ जीम उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय मदनलाल धिंग्रा मैदान व कै. सदाशिव बहिरवाडे मैदानाच्या सीमाभिंतीची उंची वाढवून त्यावर जाळी बसविणे सीमाभिंतीला तडे गेल्याने त्याची दुरूस्ती करणे किंवा नव्याने बांधावी, मैदानावर स्प्रींकलरकामी जादा गेजची पाईपलाईन टाकणे, बॅडमिंटन कोर्टवर सिंथेटीक मॅट बसविणे. नादुरूस्त बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी. प्राधिकरण, मोहननगर येथील कंपाऊंडच्या जाळ्या नव्याने बसविण्यात याव्यात. उंचवटा काढून स्लोप देणे, गणेश तलाव लॉन टेनिस कोर्ट व स्केटींग मैदान भाड्याने देणेबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)