गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर राणा करणार मॅटवरील कुस्तीचा श्रीगणेशा

श्रीगणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे,महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन जायला सर्वोतोपरी तयार होतोयतर तिकडे कोल्हापुरात राणा घामाने चिंब न्हाऊन निघत आहे. यालाकारण सुद्धा मोठे गंभीर आहे. तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय सिरीयल मध्ये आता एक वेगळे वळण मिळत आहे. मातीतल्या कुस्तीत ‘वज्रकेसरी’ झालेला राणा आतामॅटवरच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. बेमुदत निकाली कुस्तीत राणाने दलवीर ला पंचगंगेचे पाणी पाजले मात्र मातीत पकड मजबूत असणारा राणा आता मॅटवरतितक्याच चपळतेने चालू शकेल का याची उत्सुकता आता तुझ्यात जीव रंगला प्रेमींना लागली आहे.

अर्थात हे सारे मनोरंजनात्मक कथानक आहे.मात्र कुस्ती ही मनोरंजन म्हणून सुद्धा वठवणे महाअवघड कामगिरी आहे. हार्दिक जोशी उर्फ राणा यासाठी खूप मेहनत घेतो. यापूर्वी मातीतल्या  कुस्तीतले बारकावे त्याला त्याचा मित्र अतुल पाटील उर्फ भाल्या सांगत असे मात्र अतुल आता खरोखर पोलीस दलात भरती झाला असून तुला त्याला अकोला येथे प्रशिक्षणासाठी जावे लागलेआहे.

मातीतल्या कुस्तीतला राणा आता न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे मॅटवरचा कुस्तीचा श्रीगणेशा गणपतीला साक्षी ठेऊन सुरू करत आहे. राणाच्या आगामी कुस्तीसाठी त्याला मॅटवरचाकुस्त्या कश्या खेळाव्यात यासह विविध क्लुप्त्या शिकवण्यासाठी एक महान पैलवान, आदर्श वस्ताद तथा ज्यांनी भारत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल ३१ पदके मिळवून देऊन किर्तीमानीकेली ज्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना ‘अर्जुन’ पुरस्कार देऊन सन्मानित केले असे अर्जुनवीर काकासाहेब पवार यांना खास कोल्हापूरला आमंत्रित करण्यात येणार आहे.

काकासाहेब पवार हे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे संस्थापक असून त्यांनी सध्या भारताला राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पैलवान राहुल आवारे सारख्या कित्येकमल्लाना घडवले. नक्कीच तमाम कुस्तीप्रेमी रसिकांसाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत काकासाहेब पवार यांचे आगमन एक गोड धक्का देऊन जाईल यात शंका नाही.

खरोखर ही मालिका प्रत्यक्षात येण्यासाठी यामागे झटणाऱ्यातांत्रिक संघाचे योगदान मोठे आहे. यातील राणा पात्रवठवणारे हार्दिक जोशी यांनी कुस्ती शिकण्यासाठीचालवलेली धडपड नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. यामालिकेमुळे जनमानसात कुस्तीचा प्रचार प्रसार होण्यासमदत होत आहेत. ज्यांना कुस्ती माहिती नाही असेमहानगरात राहणारे सुशिक्षित लोक सुद्धा या मालिकेमुळेकुस्तीकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. या टीमनेवेळोवेळी खरी कुस्ती व खऱ्या कुस्तीचा चेहरा पुढेआणण्याचा प्रयत्न केला आहे व यावेळी सुद्धा काकासाहेबपवार यांच्या रूपाने हीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली आहेव भविष्यात सुद्धा असेच खरे पैलवान समाजासमोरआणतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)