गणेश उत्सवात डॉल्बी नाही म्हणजे नाही: विश्‍वास नांगरे पाटील

साताऱ्यात साधला पत्रकारांशी संवाद; सुज्ञ सातारकरांना विचार करण्याचे अवाहन
सातारा-  गणेश ऊत्सव हा विद्या देवतेचा उत्सव आहे. अशा या देवतेच्या उत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही याची पोलिस कालजी घेत आहेत. ऊत्सव शांततेने पार पडावा यासाठी डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही. असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी साताऱ्यात बोलताना सांगितले.

यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर अधिक्षक विजय पवार यांच्यासह पोलिस दलातील अनेक अधिकारी उपस्थित होते.

नांगरे पाटील म्हणाले साताऱ्यातील जनताही सुज्ञ आहे. चांगल्या वाईटातला फरक त्यांना नक्की कळतो. त्यामुळे जनता, मंडळाचे कार्यकर्ते हे पोलिसांच्या हातात हात घालून कायदा सुव्यस्थेचे पालन करतील असा मला विश्‍वास आहे. डॉल्बी असो किवा विसर्जन याबाबत न्यायालयाने जे आदेश दिलेत त्याचेच पालन केले जाईल. कायद्याला जे चुकीचे वाटेल ते कारवाईच्या टप्प्यात येतील असा इशारा नांगरे यांनी देताना नुतन पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांचे कौतुक केले. एसपींचे काम चांगले आहे. व संपर्कही चांगला आहे. अशा शब्दात स्तुतीसुमने उधळताना डॉल्बी नाही म्हणजे नाही.

परिक्षेत्रात एकतीस हजार मंडळांनी डॉल्बी लावली नाही असे त्यांनी आवर्जुन नमुद केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्‍न समन्वयाने सोडवला जाईल या अनुषंगाने मंगळवार दिनांक 11 रोजी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या समवेत बैठक घेण्याचे त्यांनी सुचित केले. साताऱ्याच्या गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे, त्यामुळे सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या झांजपथकांची कोणती अडचण नाही मात्र डॉल्बीचा आग्रह धराल तर ती जप्त करण्यात येईल. याचा नांगरे पाटील यांनी पुनरूच्चार केला.

गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना नांगरे पाटील यांनी काही आकडेवारी स्पष्ट केली. 96 टोळ्यानां मोक्‍का, 772 लोक तडीपार, एमपीडीचे 84 प्रस्ताव, 17 लोक स्थानबध्द, 65165 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई, व 58600 लोकांचे समुपदेशन या माध्यमातून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचा काटेकोरपणे प्रयत्न होत आहे. असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)