आळंदी : गणेश उत्सवला उद्यापासून सुरुवात होत असून हा उत्सव रविवार (दि. 23) पर्यंत चालणार आहे. या कालावधीत साजरा होत असून गणेश मंडळांनी डीजे लावू नये, अन्यथा कडकर कारवाई करण्यात येईल. तसेच उत्सव काळात आवाज मर्यादित ठेवावा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मंडपाची उभारणी रस्त्यावर न करता योग्य ठिकाणी करावी जेणेकरून वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची दक्षता सर्व गणेश मंडळांनी घ्यावी, असे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी केले आहे.
गणेश उत्सवला उद्यापासून सुरुवात होत असून सर्व सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, त्यासाठी आळंदी नगर पालिका व पोलीस ठाणे यांच्या संयुक्‍त विद्यमाने शांतता कमिटी गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी चौधर बोलत होते. याप्रसंगी मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, चाकणचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त चंद्रकांत अलसटवार, उपनिरीक्षक डी. एल. शिंदे, मच्छिंद्र शेंड्ये यांच्यास नगरसेवक-नगरसेविका, सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, शांतता कमिटी सदस्य, सामाजिक सुरक्षा विभागाच्या सर्व महिला व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते
रविंद्र चौधर म्हणाले की, गणेश मंडळांनी वर्गणी मागताना जबरदस्ती करू नये, नागरिक स्वखुशीने जेवढी वर्गणी देतील तेवढी घ्यावी, विजेची चोरी करू नये. तसेच यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस,नगर पालिका प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

  • नगर पालिकेच्या वतीने गणेश उत्सव काळात इंद्रायणी घाटावर आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सर्व उपाययोजनांची तयारी केली आहे. यंदा एकाही मूर्तीची विटंबना होणार नाही, त्यासाठी मूर्तीदान करण्यासाठी श्री फाउंडेशनला आमंत्रित केले आहे. त्यामुळे हजारो मूर्तींचे दान होणार आहे. या उत्सवास कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे आपण सर्वजण पार पाडू या.
    – समीर भूमकर, मुख्याधिकारी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)