गणेशोत्सव मंडळे समाजाच्या रक्त वाहिन्या

सासवड- सासवड येथील श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ व श्रीमंत सरदार गोदाजी राजे जगताप प्रतिष्ठान यांच्या वतीने गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड विजेते उदय जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जगताप यांनी गणेशोत्सवाची सकारात्मकता व सामाजिक महत्त्व व्यक्त केले. सार्वजनिक गणेश मंडळे ही समाजाच्या रक्त वाहिन्या आहेत. गणेशोत्सव हा सर्व धर्म समभाव व एकात्मतेचे प्रतीक असून हा पहिलाच असा उत्सव आहे की ज्या ठिकाणी सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक एकत्र येतात. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांना एकत्र आणण्याचे माध्यम म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आधुनिक संस्कृती व फ्लॅट सिस्टीम मध्ये आपापसातील एकोपा विकोपाला चाललेला आहे. यावेळी दीपक जगताप, संदीप जगताप, संग्राम जगताप, भुषण जगताप, सुनील जगताप, वामन जगताप, नंदकुमार जगताप, देवव्रत जगताप तसेच गोदाजी राजे जगताप प्रतिष्ठानचे सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)