गणेशोत्सव परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवा

पिंपरी – गणेश उत्सवामध्ये गणपती मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी तसेच सारथी हेल्पलाईनवर येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे अधिकाऱ्यांनी वेळेत निराकरण करावे, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत झालेल्या बैठकीला नगरसेविका नम्रता लोंढे, साधना मळेकर, सारिका लांडगे, नगरसेवक पंकज भालेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखापाल राजेश लांडे, मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंदाजपत्रकातील कामांची योग्यरितीने अंमलबजावणी करावी, ड्रेनेज व पावसाळी गटारांचे प्रश्न उदभवू नये याची दक्षता घ्यावी. नागरवस्ती विभागाच्या योजना शहरातील तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, विद्युत विषयक समस्या सोडविण्यासाठी महावितरण समवेत संबधित अधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करावी. तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी यावेळी दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)