गणेशोत्सव काळात प्रशासकीय समन्वय असावा : जिल्हाधिकारी

सुरक्षेसाठी बंदोबस्त वाढविण्याची सूचना

पुणे – शहरात गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी, मोहरम आदी उत्सव साजरे केले जातात. या उत्सव काळात कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्तदेखील करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.

-Ads-

जिल्हाधिकारी कार्यालयात उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजित बैठकित त्यांनी या सूचना केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अजित देशमुख, मोसमी बर्डे, तसेच महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हापरिषद, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनडीआरएफ, पाटबंधारे विभाग आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, पुणे शहरातून गणेशोत्सवाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या काळात लागणाऱ्या सर्व अत्यावश्‍यक सेवांचे पूर्व नियोजन करावे. सर्व प्रशासकीय विभागांना पूर्व नियोजन करून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)