गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय राखा- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा

मुंबई: न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून राज्यातील गणेशोत्सव उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी प्रशासन व गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात प्रशासन व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील गणेशोत्सव हा जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे हा अतिशय उत्सव आनंदात साजरा होण्यासाठी व गणेश मंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व मंडळांनी समन्वय साधावा. पोलीस व प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती अंमलबजावणी करावी. समन्वय समितीच्या मागण्यासंदर्भात प्रशासनास योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाने देण्यात येत आहेत. यावर्षी कागदपत्रे जमा केल्यानंतर व ऑनलाईन माहिती भरल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)