गणेशोत्सव आनंदोत्सव ठरावा !

सर्वांच्या लाडक्‍या अशा गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे.बुध्दीचा देव असलेल्या गणरायाचा हा उत्सव आनंदाचा उत्सव ठरावा अशी अपेक्षा यानिमीत्ताने या उत्सवाशी संबंधित विविध मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

मूल्यांचा जागर व्हावा
गणेशोत्सवाची परंपरा ही स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली. आज देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आता आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि लोकशाही मूल्यांचा जागर करावा लागणार असल्याचे मत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिक व युवक एकत्र येत असतात. त्यावेळी आपले गाव स्वच्छ कसे राहील, गावाला स्वच्छ पाणी कसे मिळू शकेल यासह शैक्षणिक पातळीमध्ये वाढ होवून गुणवत्तेवर भर देण्याच्या दृष्टीने उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.
कैलास शिंदे,सीईओ,जिल्हा परिषद

गणेशोत्सव हा आनंदोत्सव
साताऱ्यात ऐतिहासिक गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेशउत्सव हा भकती आणि आनंद याचा मोठा उत्सव आहे. सर्व सातारकरांनी अत्यंत आनंदात गणेश उत्सव साजरा करावा. साताऱ्यात श्री विसर्जनाचा पेच सुटला आहे त्यामुळे सातारकरांनी काळजी करण्याचे कारण नाही. मंगळवार तळ्याचा विषय कायदेशीर दृष्टया महत्वाचा होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी आधीपासूनच सहकार्याची भूमिका घेतली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करावे. साताऱ्याचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक व आदर्शवत असायला हवा. त्यासाठी सातारा पालिका सातत्याने सक्रीय असते.
माधवी कदम, नगराध्यक्ष सातारा नगर परिषद

सातारकरांना शुभेच्छा
सातारा पालिकेने श्री विसर्जनासाठी युध्दपातळीवर नियोजन केले आहे. ऐतिहासिक हौदांसह कृत्रिम तळ्यांचे नियोजन यांचे काम पूर्णत्वाला गेले असून त्याच्या निविदा पण काढण्यात आल्या आहेत. मंगळवार तळ्याची व्यवहार्यता लक्षात घेता त्या तळ्यात विसर्जन करण्यास तशी कोणतीच कायदेशीर अडचण नाही. देवी चौक मोती चौक चांदणी चौक ते मंगळ्वार तळे रस्ता विसर्जन मिरवणुकीसाठी तेथील अतिक्रमणे तत्काळ काढण्यात येतील. सातारकरांसाठी यंदाचा गणेशोत्सव सुखशांती व समृध्दीचा ठरो हीच गणेशाचरणी प्रार्थना आहे.
शंकर गोरे, मुख्याधिकारी सातारा नगर परिषद

सामाजिक भान ठेवावे
प्रत्येक गोष्ट प्रशासनावरच सोपवून चालणार नाही. गणेश मंडळांनी गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा सांभाळली. तर गणेश विसर्जन सोहळयास अडचण होणार नाही. गणेशोत्सव आनंदात भक्ती भावे साजरा करताना सामाजिक भान ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. जल्लोष साजरा करताना आवाजाची मर्यादा सांभाळली तर यामधून होणारे त्रास उद्‌भवणार नाहीत. कायद्याचे काटेकोर पालन करताना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचा आग्रह प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी घेणे आवश्‍यकच आहे. गणेश मंडळांनी सीसीटीव्हीचा अवलंब केल्यास अनुचित प्रकाराना आळा बसेल.
श्रीकांत शेट्ये,प्रकश मंडळ सातारा.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)