गणेशोत्सवामुळे फुल बाजारात तेजी

भावात लक्षणीय वाढ : झेंडूची आवक घटली

पिंपरी – गणेशोत्सवामुळे फुलांना मागणी वाढली आहे. मात्र, पाऊस सुरु असल्याने मालाची आवक कमी होत असल्याने, फुलांचे भाव तिपटीने वाढले आहेत. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवामध्ये फुलांमध्ये शेवती व झेंडूला तुलनेत मागणी वाढली आहे. पावसामुळे झेंडूच्या आवकेवर मात्र परिणाम झाला आहे. सध्या राजा शेवंतीचा हंगाम सुरु झाला आहे.

फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढील प्रमाणे – झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता) – 100 ते 120 रुपये किलो, गुलछडी – 250 ते 300 रुपये किलो, लिली बंडल – 30 ते 40 रुपये, जरबेरा बंडल – 100 ते 150 रुपये, गुलाब गड्डी (साधा) – 30 ते 40 रुपये, गुलाब गड्डी (डच) – 100 ते 120 रुपये, अष्टर गड्डी (चार नग) – 30 रुपये, अबोली 150 ते 200 रुपये बंडल, जुई बंडल 350 ते 400 रुपये बंडल. किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा भाव प्रति नग 20 रुपये असून, डझनचा भाव 200 रुपयांवर पोचला आहे, अशी माहिती सप्तश्रुंगी पुष्प भांडारचे गणेश आहेर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)