गणेशोत्सवामुळे झाल्या ‘सोज्वळ’

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे आनंदी वातावरण असल्यामुळे आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेही या सणाचा पुरेपूर आनंद लुटत आहे. यादरम्यान पूनम पांडेचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.नुकताच सोशल मीडियावर गणेश भक्त असलेल्या पूनमने आपला एक फोटो शेअर केला आहे. गणपतीच्या दर्शनाला गेलेली पूनम यात पारंपारिक पोशाखात दिसते. तिने अंधेरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली.

आपण पूनमला नेहमीच हॉट लूकमध्ये पाहिले आहे. दरवेळेस आपल्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर आग लावणाऱ्या पूनमचा यावेळचा सोज्वळ लूक नेटिझन्सना फारसा आवडलेला न दिसल्यामुळेच तिच्या या सोज्वळ लूकची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. गंमत म्हणजे पूनम पांडेने गणपतीच्या समोरच्या उंदराच्या कानामध्ये आपली मनातली एक ईच्छा बोलून दाखवल्याचाही फोटो शेअर केला आहे. तिने उंदराच्या कानात कोणती ईच्छा बोलून दाखवली असेल, याचा अंदाजही आता नेटिझन्स करायला लागले आहेत.

गणेशोत्सावामुळे एकट्या पूनमनेच नव्हे, तर हॉट राखी सावंत, उर्वशी रौतेला आदींनीही आपल्या घरच्य गणपतीचे फोटो सोशल मिडीयावर टाकले आहेत. त्यावेळी आपला सोज्वळ लुक व्हायरल होईल याची काळजीही या अभिनेत्रींनी घेतली आहे. उर्वशी रौतेलाने अलिकडेच “हेट स्टोरी 4’मध्ये काम करायला नकार दिला होता. त्यामध्ये इंटिमेट सीन खूप असल्याने तिचा नकार होता. मात्र दिग्दर्शक विशाल पांड्याने हे “इंटिमेट सीन’ कमी करण्याचे आश्‍वासन दिल्यावर तिने “हेट स्टोरी 4′ मध्ये काम करायची तयारी दर्शवली आहे. तिच्यात झालेला हा बदलही लक्षात येण्याजोगा आहे.

टिव्ही चॅनेलवर महिला विश्‍व गाजवणाऱ्या एकता कपूरनेही कधी नव्हे, ते यावेळी गणेशोत्सव साजरा केला आणि आपल्या युनिटमधील ढिगभर कलाकारांना घरी दर्शनासाठी बोलावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)