गणेशोत्सवाने फळ बाजारात बहार

मागणी वाढली : आवक आणि भाव स्थिर

पुणे, दि. 27 – मार्केट यार्डात सर्वच प्रकारच्या फळांची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवामुळे फळांना मागणीही जास्त आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्व फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
येथील फळबाजारात रविवारी अननसची तीन ट्रक, मोसंबीची 55 ते 60 टन, संत्र्याची 8 ते 10 टन, डाळिंबाची 150 ते 200 टन, पपई 20 ते 22 टेम्पो, लिंबाची अडीच ते तीन हजार गोणी, चिक्कू एक हजार बॉक्‍स, पेरुची तीनशे ते साडे तीनशे ट्रे, कलिंगडाची वीस ते पंचवीस टेम्पो आणि खरबुजाची आठ ते दहा टेम्पो, सफरचंद, प्लम, नासपती आणि पिअरची सहा ते सात हजार डाग, तर सिताफळाची अडीच टन आवक झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 50-300, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 120-220, (4 डझन ) :50-130, संत्रा ः (3 डझन) 150-300, (4 डझन) : 80-150, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 20-70, गणेश 10-30, आरक्ता 20-40. कलिंगड ः 5-15, खरबुज ः 10-25, पपई ः 3-20, चिक्कू : 100-400, पेरू (20 किलो) ः 500-600, सीताफळ ः 10-150. सफरचंद ः सिमला (20 ते 25 किलो) ः 1500-2000, गोल्डन (20 ते 25 किलो) 1000-1500, प्लम (5 ते 6 किलो) ः 500-600, नासपती (15 किलो) ः 700-800, पिअर (15 किलो) : 700-1200.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)