गणेशोत्सवानिमित्त पीके महाविद्यालयात व्याख्यानमाला

महाळुंगे इंगळे- गणेशोत्सवाचे औचित्य साधून कडाचीवाडी (ता. खेड) येथील पीके कॉमर्स ऍन्ड सायन्स ज्युनिअर महाविद्यालयामध्ये पाच दिवस “गणेशोत्सव व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य सुरेश भोर यांनी दिली. सोमवारी (दि. 28) सकाळी सव्वाअकरा वाजता शिवव्याख्याते ऍड. रवींद्र यादव यांचे “छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवारी (दि. 29) सकाळी साडेआठ वाजता गोखले इन्स्टिट्यूट पुणेचे समन्वयक डॉ. प्रा. कैलास बवले यांचे “व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर, बुधवारी (दि. 30) सकाळी सव्वाअकरा वाजता मानव संसाधन विकास तज्ज्ञ प्रा. सत्यवान सहाणे यांचे “संघर्षाकडून यशाकडे’ या विषयावर, गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेआठ वाजता खेड तालुका अंधश्रद्धा समितीचे सदस्य “दैनंदिन जीवनातील अंधश्रद्धा व त्यांचे निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर शुक्रवारी (दि. 1) सकाळी सव्वाअकरा वाजता महाविद्यालयामधील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी “काव्यवाचन व कथाकथन स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)