गणेशोत्सवानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्‌घाटन

पुणे – गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त महापालिकेने श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. महापालिकेच्या सारसबागेसमोरील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 11 या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होईल.

या प्रदर्शनात आजपर्यंतच्या गणेशोत्सव काळातील विविध प्रसंगानुरूप छायाचित्रे पाहता येणार आहेत. याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचा समावेशही यामध्ये करण्यात आला आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू, शिक्षण संस्था यांची छायाचित्रे आणि माहिती, त्रिशुंड गणपती, चतु:श्रुंगी मंदिर, पर्वती मंदिर, सारसबाग मंदिर, दगडूशेठ मंदिर, पाताळेश्‍वर, वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, शनिवारवाडा, नाना वाडा, विश्रामबागवाडा, आगाखान पॅलेस, महात्मा फुले वाडा, शिंदे छत्री, डेक्कन कॉलेज, अभियांत्रिकी, फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, रेल्वे स्थानक, विमानतळ, शहरातील रस्ते या संबंधिच्या छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शिनीत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)