गणेशोत्सवात वंचित, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मंडळांनी पुढे यावे

नगर – गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटन होते. अशा संघटित गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबविल्यास विकासात्मक बदल घडणार आहे. विशेषत: वंचित व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मंडळांनी पुढे यावे. इतर खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविल्यास ते सत्कर्मी लागून खऱ्या अर्थाने श्रीगणेशाची सेवा होणार असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली.

हुतात्मा स्मारक येथील त्रिमूर्ती युवा प्रतिष्ठानच्या गणपतीची आरती प्रा. विधाते यांच्या हस्ते झाली; यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, वकील सेलचे उपाध्यक्ष ऍड. वैभव मुनोत, सारंग पंधाडे, ओम पांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंदार लष्कर, उपाध्यक्ष संकेत पवार, सोमनाथ रोकडे, अन्वर शेख, अमोल जाधव, महेश टेपाळे, बिभिषण डमरे, सिध्दांत ससाणे, महेशराजे ससे, योगेश नेमाणे, विक्रांत भालसिंग, गणेश लष्कर, जय वाघस्कर, सतीश वाडेकर, सागर अनारसे, ऋषिकेश दरंदले, मुशीर बागवान, नितीन खंडागळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मंदार लष्कर यांनी केले. आभार संकेत पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)