गणेशोत्सवात महापालिका उभारणार हिरकणी कक्ष

मंडळांना परवानगीसाठी आज सायंकाळपर्यंत मुदत

पुणे – गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणुकीत होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष महापालिका उभारणार आहे. त्यासाठीचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या गणेशोत्सव आढावा बैठकीत दिले आहेत.

शहरातील गणेश मंडळानी अजूनही ऑनलाइन अर्ज केले जात असल्याने या मंडळांना गुरूवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवाने देण्यात येणार आहेत. दरम्यान, विसर्जन मार्ग तसेच गर्दीची ठिकाणे लक्षात घेऊन हे हिरकणी उभारले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीत उपमहापौर तसेच आयुक्तांनी गणेशोत्सव कालावधीत केलेल्या उपाय-योजनांची माहिती घेतली. तसेच या कालावधीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. जास्तीत जास्त प्रमाणात मंडळे, सार्वजनिक गणेशात्सव मंडळे, संस्था यासर्वाशी समन्वय ठेवून पर्यावरणपूरक गणशोत्सव होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिल्या.

उपमहापौर,आयुक्त रात्री करणार पाहणी
गणेशोत्सव कालावधीत विविध उपाय-योजनांची माहिती तसेच दैनंदिन आढावा घेण्यासाठी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि आयुक्त सौरभ राव हे रात्री 12 ते 3 या वेळेत शहरात सर्वत्र पाहणी करणार आहेत. तसेच इतर अधिकाऱ्यांनाही क्षेत्रीय कार्यालयनिहाय याच वेळेत शहर स्वच्छतेचा आढावा घेण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)