गणेशोत्सवात बेकायदा मंडपावर कारवाई करा

अन्यथा कारवाईला सामोरे जा; हायकोर्टाची जिल्हाधिकारी आणि पालीका अधिकाऱ्यांना तंबी

मुंबई – आगामी सण- उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण आणि बेकायदेशीर मंडपांबाबतच्या
नियमावलीचे तसेच न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करा. आगामी गणेशोत्सवात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे शहरात एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. या आदेशाचे पालन झाले नाही तर जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी अवमान कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा अशी तंबीच उच्च न्यायालयाने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध उत्सवाच्या निमित्तीताने होणाऱ्या ध्वनी प्रदुषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्‍चभूमीवर ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला “सायलन्स झोन’ची माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई आणि उपनगरात 110 शांतता क्षेत्र निश्‍चित करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली. याची दखल न्यायालयाने घेतली. ध्वनी प्रदुषणाबरोबरच आगामी गणेशोत्सवात रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा न आणता केवळ एक तृतीयांश जागेतच, सर्व बाबींची पूर्तता करुन मंडप बांधण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले.

रस्त्यावर बेकायदा मंडप उभारले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.त्याचबरोबर सायलेंस झोनच्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करत लाऊड स्पीकर्सचा वापर आणि ध्वनी प्रदूषणासाठी आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करा . नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारा. अन्यथा यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)