गणेशोत्सवात पावसाची विश्रांती राहणार

पुणे – गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असल्याने सध्या सगळीकडे जोरदार तयारी सुरू झाली आहे. या तयारीदरम्यान पावसाने सुद्धा उघडीप दिल्याने थोडा दिलासा मिळाला असून नागरिकांना मनसोक्त खरेदी करता येत आहे. पावसाची ही विश्रांती गणेशोत्सवात ही राहण्याची शक्‍यता आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली होती. दमदार पाऊस सर्वत्र झाल्याने राज्यातील बहुतांशी मोठी धरणे भरली असून त्यातून विसर्गही सुरू आहे. सध्या तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात कुठेही पावसाची शक्‍यता नाही. मान्सूनचा वेग मंदाविला आहे. मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता नाही; पण घाटमाथा तसेच कोकणात तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगाल उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा पश्‍चिम बंगाल, ओरिसाकडे सरकल्याने सध्या या राज्यात सध्या पावसाचा जोर आहे. मध्य भारत आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये सर्वत्र सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)