गणेशोत्सवात पावसाची उघडीप?

पुणे – गेले पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दिलेली उघडीप आगामी काळातसुद्धा कायम राहण्याची शक्‍यता आहे.

सध्या मान्सूनचे वारे पश्‍चिम बंगाल व ओरिसा या राज्यातून वाहत आहेत त्यामुळे याठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. पण दक्षिणेकडील भागात मात्र मान्सून क्षीण झाला आहे. मान्सून अॅक्‍टिव्ह होण्यासाठी बंगालच्या उपसागर किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण व्हावे लागते. पण सध्या तशी चिन्हे नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवात पाऊस येण्याची शक्‍यता कमी आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या चोवीस तासांत राज्यात कोकण आणि गोवा वगळता इतरत्र ठिकाणी हलक्‍या पावसाच्या सरी कोसळतील. पुण्यात आकाश ढगाळ राहणार आहे.

सप्टेंबरमध्येच “ऑक्‍टोबर हिट’
राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडे आणि अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील कमाल तापमानामध्ये वाढ झाली असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पावसाच्या सप्टेंबरमध्येच “ऑक्‍टोबर हिट’ चा अनुभव मिळतो आहे. पुण्यात बुधवारी तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)