निगडी – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी- चिंचवड शहर शाखा या संघटनेच्या वतीने सांगवी, पिंपळे गुरव येथे डेंग्यू आजाराविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. मंडळाच्या संध्याकाळच्या आरतीच्या वेळी व कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे शहराध्यक्ष स्पीकर, पत्रकांच्या माध्यमातून नागरिकांना डेंग्यू होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाययोजना याची माहिती देत आहेत. ही जनजागृती गणपती विर्सजनापर्यत दररोज केली जाणार आहे.

डेंग्यू आजार म्हणजे डंख छोटा, धोका मोठा त्यामुळे हिवताप, डोकेदुखी, डोळ्याच्या खोबणीत दुखणे, अंगावर लालसर रॅश अथवा पुरळ उठणे, तीव्र पाठदुखी इ. डेंग्यूची लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डॉक्‍टरांशी संपर्क साधावा. महापालिकेचे कर्मचारी पण आरोग्याची काळजी घेण्याचे वारंवार आवाहन करीत असतात. पण प्रत्येक नागरिकांनी पालिकेकडून अपेक्षा न करता आपण स्वतःहून आपली परिसराची व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे मत शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी व्यक्‍त केले. यावेळी गणेशोत्सवाच्या वेळी प्लॅस्टिक न वापरण्याचे व गर्दीच्या ठिकाणी बेवारस वस्तू, संशयास्पद व्यक्‍ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन ही त्यांनी केले. या मोहिमेत “ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यानी ही सहभाग नोंदवला.

राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, विकास शहाणे, संगीता जोगदंड, बदाम कांबळे, मुरलीधर दळवी, राहुल शेंडगे, विनायक विसपुते, गजानन धाराशिवकर, वसंत चकटे, अरविंद मांगले, जतीन जेतवण, रोहित शेळके, नूतन शेळके, ऋतुजा जोगदंड, सुर्वणयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक शहाणे, प्रदीप गायकवाड, शिवानंद तालीकोटी आरोग्य विभागाचे सुपरवायजर एच.एम. बामले, वरुण कांबळे आदींनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)