गणेशोत्सवात डीजे बंदीमुळे ध्वनीप्रदुषण घटले 

मुंबई ,पुणे नाशिक शहरात पारंपारीक वाद्यांनी आवाजाची पातळी ओलांडली आवाज फांऊडेशन न्यायालयात माहिती 

मुंबई: ध्वनी प्रदुषणाच्या नियमांची अंमल बजावणी होत नसल्याची आरोळी ठोकणाऱ्या आवाज फांऊडेशने आता ध्वनी प्रदुषणात घट होत असल्याची माहिती न्यायालयात दिली. न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्यानेच ध्वनी प्रदुषण कमी झाले असले तरी मुंबई पुणे नाशिकसह काही शहरांमध्ये ढोल, ताशे आणि बॅंजोमुळे आवाजाची पातळी ओलांडल्याचे याचिकाकर्ते आवाज फांऊंडेशनने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध उत्सवाच्या निमित्याने होणाया ध्वनी प्रदुषणाच्या पार्श्वर्भूमीवर सामाजिक संस्था आवाज फाऊंडेशन तसेच अन्य काहींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी आवाज फांऊंडेशनने गणेशोत्सावातील विसर्जन मिरवणूकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनी प्रदुषण कमी झाले . अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत सांताक्रुझ येथे सर्वाधिक 113.9 डेसिबल आवाजाच्या पातळीची नोंद झाली. ही गेल्यावर्षीच्या आवाजाच्या पातळी पेक्षा 6 डीसेबलने कमी झाली आहे.

मात्र मुंबई पुणे नाशीक आदी शहरी भागात मात्र पारंपारीक वाद्य असलेल्या ढोल, ताशे, बॅंज्यो हे अँम्प्लिफायरसोबत लाऊडस्पिकरला जोडल्यामुळे आवाजाची पातळी ओलांडली गेल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. तसेच मुंबईतील गिरगाव चौपाटीवर इतर सार्वजनिक मंडळांनी पारंपारीक वाद्ये वाजवण्याचे थांबविल्यानंतरही काही राजकीय पक्षांनी पुरस्कृत गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांसमोर रात्री एक वाजेपयरत लाऊडस्पिकरवर ढोल, ताशे आणि बॅंज्यो वाजवल्याची माहिती हायकोर्टाला दिली. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने याबाबत पोलिस प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 24 नोव्हेंबरपयरत तहकूब केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)