गणेशोत्सवात कायदा मोडणारांची गय केली जाणार नाही

डॉ. पंकज देशमुख : पारंपरिक वाद्यांचा उत्सवात वापर करण्याचे आवाहन
वाई,  (प्रतिनिधी) – गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव शांततेत व्हावा, कोणी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लघन करू नये, शासनाच्या अटींना अधीन राहून गणशोत्सव साजरा करावा. कायद्याचे उल्लंघन करणारांची गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक  पंकज देशमुख यांनी केले. वाईमध्ये आयोजित केलेल्या पोलिस प्रशासन, नगरपालिका व गणेश मंडळांची शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके,तहसिलदार रमेश शेंडगे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, पाचगणी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तृप्ती सोनावणे, महाबळेश्‍वरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, भुईंजचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक बी. बी. येडगे, पी. एस. कदम, शिरीष शिंदे, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, नगसेवक दीपक ओसवाल, सतीश वैराट यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंकज देशमुख म्हणाले, वाई हे सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा असणारे शहर आहे. वाईला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. याचे पावित्र्य जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही सार्वजनिक उत्सवाचा मुख्य हेतू समाजाची एकी करणे, त्यामधून समाज प्रबोधन करणे हा असतो. उत्सवाच्या निमित्ताने मुठभर लोक हुल्लडबाजी करून संपूर्ण शहरास व समाजास वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. डॉल्बीवर शासनाने पूर्ण बंदी घातली असून कोणत्याही मंडळाने डॉल्बीवर अनाठायी खर्च करू नये. गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक उपक्रम राबवावेत.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके म्हणाले, मंडळांना यावर्षी शासनाने शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत देखावे सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंडळाच्या मंडपाचा आकार नियमानुसार असावा. गणेशोत्सवात शहरातील मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. यावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, दीपक ओसवाल, काशिनाथ शेलार, अशोक सरकाळे, विश्‍वास पवार, अमित सोहनी यांनी मनोगत व्यक्‍त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)